कुर्‍हेपानाचेत जुगारींच्या अटकेला सरपंचांसह चौघांचा विरोध ; पोलिसांनी दाखवला कारवाईचा ‘एक्का’

चौघे कारवाईच्या कोठडीत : सरपंचांना अपात्र करण्याबाबत पोलिस देणार प्रस्ताव


भुसावळ : भुसावळ तालुका पोलिसांनी कुर्‍हे पानाचे येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकत 16 जुगारींना अटक केली मात्र गावातील सरपंचासह अन्य चौघांनी थेट पोलिसांनाच धक्काबुक्की दोन आरोपींना त्यांच्या ताब्यातून पळवून लावले. पोलिसांना उद्देशून ‘तुमची औकात दाखवून देऊ. तुम्ही आमचे काहीही वाकडे करू शकत नाही,’ अशी धमकीही भरली मात्र पोलिसांनी दमदाटी करणार्‍या सरपंच जीवन प्रल्हाद पाटीलसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना कारवाईच्या कोठडीत टाकले.

‘राज’गर्जनेनंतर भुसावळात पोलिस अलर्ट : 12 मनसे कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीस

गोपनीय माहितीनंतर पोलिसांचा छापा
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना कुर्‍हे पानाचे येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर विशेष पथकाने मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकून 16 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यात गोपाळ बारी व महेश वराडे यांचा समावेश होता. या दोघांना घेऊन जात असताना सरपंच जीवन प्रल्हाद पाटील, प्रमोद रामा भोई, ईश्वर भागवत भोई व सुभाष भिका पाटील यांनी पोलिसांना मारहाण करून कारवाईला विरोध केला. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी रमण सुरळकर यांच्या मनगट, नाकाला दुखापत करून त्यांच्या ताब्यातील बारी व वराडे यांना सोडवून पळ काढला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रमण सुरळकर यांच्या फिर्यादीवरून सरपंचासह चौघांंविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली.



सरपंचाविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव देणार
कुर्‍हे पानाचे येथील सरपंच जीवन पाटील याने पथक जुगार्‍यांवर कारवाई करत असताना पोलिसांना धक्काबुक्की केली. दोन जुगार्‍यांना पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावले. त्यांना अपात्र करावे यासाठी पोलिस प्रशासनामार्फत जिल्हा प्रशासनाकडे रीतसर प्रस्ताव सादर करणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.

जळगावच्या कंजरवाड्यात दोन गटात तुफान दगडफेक : पोलिसांच्या वाहनांसह दुचाकींची तोडफोड


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !