भुसावळात रमजान ईदनिमित्त शिर खुर्म्याचे वाटप
भुसावळ : भुसावल शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर परीसर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व ताजोद्दीन बाबा दर्गाहजवळ सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी ईद निमित्त शिर खुर्म्याचे बुधवारी वाटप करण्यात आले.
भुसावळात रमजान ईदनिमित्त विश्व शांतीसाठी प्रार्थना


यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हाध्यक्ष मो.मुनव्वर खान, शहराध्यक्ष सलीम गवली यांनी उपस्थितांना शिरखुर्म्याचे वाटप केले. प्रसंगी सेवा दलाचे शहराध्यक्ष संजय खडसे, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी.कोटेचा, महिला शहर उपाध्यक्षा हमीदा गवळी, शहर ससचिव हमीद शेख, आदिवासी महिला शहराध्यक्ष फातेमा आपा, रमजान खाटीक, जॉनी गवली व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.