बेताल वक्तव्य करणार्‍या आमदार अमोल मिटकरी यांचा यावलमध्ये निषेध


यावल : आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल अपमानास्पद्ध अपशब्द वापरून समस्त बाह्यण समाजाच्या भावना दुखावल्याने यावल शहरात त्यांचा निषेध करण्यात आला. या संदर्भात वेदशास्त्र संपन्न रामशास्त्री नाईक यांच्या नेतृत्वाखाली समस्त ब्राह्मण समाज संघ व परशुराम मंडळाच्या वतीने आमदार मिटकरी यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात करण्याच्या मागणीचे निवेदन यावलचे तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले.

‘राज’गर्जनेनंतर भुसावळात पोलिस अलर्ट : 12 मनसे कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीस

गुन्हा दाखल करण्याची मागणी
आमदार अमोल मिटकरी यांनी ईस्लामपुर येथील जाहीर सभेत बाह्यण समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजात जातीय द्वेष निर्माण केला आहे. मंत्री जयंत पाटील, मंत्री धंनजय मुंडे यांनीदेखील त्यांच्या वक्त्यावर हसुन दाद दिल्याने या कृतीतुन आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यास जणु या दोघांचे अनुमोदन असल्याचे प्रतित होते त्यामुळे यावल येथे संपुर्ण बाह्मण समाजाच्या बांधवांच्या वतीने या देखील नेत्यांचा देखील जाहीर निषेध करण्यात आला. आमदारांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा व विधानमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. वेदशास्त्र संपन्न रामशास्त्री नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.



मेहरुण तलावावर गेलेल्या 16 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !