एरंडोल तालुक्यातील महिलेचा विनयभंग करीत मारहाण


धरणगाव : जुन्या वादातून एरंडोल तालुक्यातील एका गावातील महिलेला मारहाण करण्यात आली व विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

देशात सत्तापालट नाही मात्र… जाणून घ्या भेंडवळची भविष्यवाणी

पोलिसात तक्रार दिल्याचा राग
एरंडोल तालुक्यातील एका गावातील 42 वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. याच गावातील अशोक सोनवणे यांच्याशी त्यांचा वाद होता. याबाबत महिलेने यापूर्वी पोलिसात तक्रार दिल्याने याचा राग मनात ठेवून अशोक सोनवणे याने मंगळवार, 3 मे रोजी सकाळी 10 वाजता विवाहितेला अश्लिल शिविगाळ करून महिलेला मारहाण केली तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी महिलेचा फिर्यादीवरून संशयीत आरोपी अशोक सोनवणे विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण निकम करीत आहे.



कुर्‍हेपानाचेत जुगारींच्या अटकेला सरपंचांसह चौघांचा विरोध ; पोलिसांनी दाखवला कारवाईचा ‘एक्का’

 

जळगावच्या कंजरवाड्यात दोन गटात तुफान दगडफेक : पोलिसांच्या वाहनांसह दुचाकींची तोडफोड


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !