रावेर तालुक्यातील निलेश पाटील ग.स.सोसायटीच्या संचालकपदी


रावेर : जळगाव येथील ग.स.सोयायटीच्या निवडणुकीत संचालकपदी प्रथमच युवा चेहरा असलेले निलेश पाटील यांना मतदारांनी संधी दिली. अडी-अडचणीत मदतीला धावून जाणारे, दांडगा जनसंपर्क असलेले व आपला हक्काचा माणुस म्हणून निलेश पाटील तालुक्यात परीचीत आहे. मूळचे शिंगाडी. ता.रावेर येथील रहिवासी असलेले व नांदुरखेडा येथे शिक्षक असलेले 35 वर्षीय निलेश पाटील हे आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या जळगाव येथील ग.स.सोसायटीचे प्रतिनिधीत्व करतील. यापूर्वी ते भुसावळ येथील शिक्षकांच्या पतपेढीतदेखील संचालक आहेत.

हिंगोण्यातील खून प्रकरणी पिता-पूत्रांना शिक्षा

प्रगती पॅनलकडून विजय
मराठा चेहरा असलेले निलेश पाटील यंदा झालेल्या लक्षवेधी निवडणुकीत पाच हजार 382 मते मिळवून विजयी झाले. ते प्रगती शिक्षक सेना या गटाकडून निवडणूक रींगणात होते तर त्यांच्या पत्नीदेखील रावेर येथे शिक्षिका आहेत.



दांडगा जनसंपर्क आला कामी
कोणत्याही निवडणुकांमध्ये जातीय समीकरण महत्वाचे असते. याचा ग स संचालक निलेश पाटील यांना पूरेपूर लाभ झाला. शासकीय कर्मचारी अधिकार्‍यांच्या संपर्कात रहाणे फायद्याच ठरले, सामाजिक कार्यात मदत करणे, अडी-अडचणीला धावून जाणे तसेच त्यांच्या दांडगा जनसंपर्कामुळे त्यांचा विजयश्री सोपा झाला आहे.

खुनाच्या गुन्ह्यातील पसार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !