वरणगावातील समांतर महामार्गासाठी तीन कोटींचा निधी मंजूर

भाजपाने वरणगाव शहरात फटाके फोडून केला जल्लोष


भुसावळ : वरणगाव शहरातील समांतर महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशाने डीजीटीएम संतोष के.बाजपाई यांच्या स्वाक्षरीने वरणगाव शहरातील समांतर महामार्गाच्या कामासाठी तीन कोटी 28 लाख 98 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णनानंतर वरणगाव भाजपाच्या वतीने बसस्थानक चौकात फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

नेत्यांचा पाठपुरावा मोलाचा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माजी मंत्री गिरीश महाजन, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, डॉ.राजेंद्र फडके यांच्याकडे भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दहा वर्षांपासून मागणी लावून धरली होती व त्या मागणीला यश आले आहे.



जल्लोष प्रसंगी यांची उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा अध्यक्ष सुनील माळी, आकाश निमकर, शामराव धनगर, महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रणिता पाटील, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे, मिलिंद मेढे, हितेश चौधरी, गोलू राणे, नटराज चौधरी, साबीर कुरेशी, मुस्लिम भाई अन्सारी, योगेश माळी, बळीराम सोनवणे, के.के.अंभोरे, शाम सुरलकर, संदीप माळी, अंकुश साबळे, ऋषिकेश महाजन, रॉक्स कश्यप, पप्पू ठाकरे, आकाश महाजन, किरण धुंदे, गंभीर माळी, रामभाऊ माळी, लखन माळी, सागर पवार, किरण भैसे, सतीश पालवे, सौरभ पाटील, वैभव वाणी, सुशील झोपे आदी उपस्थित होते.

ही कामे लागणार मार्गी
या निधीतून फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, बसस्थानक चौकातील चौफुली विस्तारीत करण्यासह सहा छोटे सर्कल तयार करणे आदी कामे केली जाणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !