उपोषण आंदोलनाची दखल : शेलवडलाच राहणार बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा

विलीकरणाचा निर्णय अखेर रद्द : खासदार रक्षा खडसे यांची मध्यस्थी


मुक्ताईनगर : बोदवड तालुक्यातील शेलवड येथील बँक ऑफ महाराष्ट्राची शाखेचे बोदवड शाखेत विलीकरण होणार असल्याने या निर्णयाविरोधात शेलवड गावातील बँकेच्या शाखेसमोर दोन दिवसांपासून उपोषण छेडण्यात आले होते. खासदार रक्षा खडसे यांनी बुधवारी ग्रामस्थांची भेट घेतली व समस्या जाणल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांशी संवाद साधून अडचणी सांगितल्यानंतर बँक अधिकार्‍यांनी शाखेचे स्थलांतर होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला.

भुसावळातील 63 धार्मिक स्थळांनी घेतली ध्वनिक्षेपक वापराची परवानगी

सुविधा पुरवण्याचे आश्वासन
मूळ शाखेचे स्थान, नेटवर्क समस्या, मोठा व सुरक्षित शाखा परीसराचा अभाव, व्यवसाय नफा-तोटा आदी सर्व गोष्टींचा विचार करता शेलवड शाखेत सर्व सुविधांची पूर्तता करणे बँकेला अवघड होत असल्याने शेलवड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे बोदवड शाखेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव होता मात्र आता शेलवडची शाखा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू राहील. ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यात येईल, इतरही सुविधा पुरवण्याात येतील, असे आश्वासन बँकेच्या अधिकार्‍यांनी दिले.



यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपचे बोदवड तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, मयुर बडगुजर, राजेंद्र डापसे, सरपंच समाधान बोदडे, उपसरपंच रामदास माळी, वामन म्हस्के, डॉ.कांतिलाल बरडीया, सुपडू गायकवाड, जगतराव पाटील, एन.डी.चौधरी, भगवान चौधरी, भगवान पाटील, ईश्वर वाणी, अर्जुन माळी, गोकुळ माळी, संजय गोविंदा करोत, कैलास बंड उपस्थित होते.

पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !