जळगाव मनपाच्या पहिल्या महिला आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड
जळगाव : जळगाव मनपाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याची संधी मिळाली आहे. आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने बुधवारी सायंकाळी काढले आहेत. गेलीया चार दिवसांपासून प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी डॉ.गायकवाड यांच्याकडेच होती.
खुनाच्या गुन्ह्यातील पसार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त
जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर आयुक्तपदाची सूत्रे कुणाच्या हाती येणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, 30 रोजीच सायंकाळी आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे आला होता. आता त्यांच्याकडेच आयुक्तपदाची जबाबदारी आली आहे. नगरविकास खात्याने त्यांना महापालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती प्रदान केली आहे. अर्थात, त्या जळगाव महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. डॉ. विद्या गायकवाड या जळगाव महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून वर्षभरापासून कार्यरत आहेत. आता त्यांच्याकडेच महापालिकेची धुरा आली असून शहर विकासाला गती देण्याचे काम त्यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

