गहुखेडा विकासोवर शेतकरी पॅनलचे वर्चस्व
सावदा : येथून जवळच असलेल्या गहुखेडा येथील गहुखेडा विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत हेमराज पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्व 13 उमेदवार निवडून आले. प्रतिस्पर्धी शिवाजीराव पाटील यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव झाला.
भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार : दोघांविरोधात गुन्हा
या उमेदवारांनी मिळवला विजय
अत्यंत चुरशीच्या झालेलेल्या या निवडणुकीत हेमराज पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले. त्यात इतर मागासवर्गीय मतदारसंघातून शेषराव रामदास पाटील, भटके विमुक्त मतदारसंघातून मधुकर अर्जुन तायडे, महिला राखीव प्रवर्गातून उषाबाई अशोक पाटील, शारदा वसंत पाटील, अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून अनिल कडू तायडे, सर्वसाधारण मतदारसंघातून हेमराज पंडितराव पाटील (रायपूर), वसंत चावदस चौधरी (गहुखेडा), गोपाळ आत्माराम पाटील (रायपूर), सदाशीव सोमा चौधरी (वरणगाव), दिनेश मधुकर कोळी (रणगाव), रामकृष्ण मंगा चौधरी (रायपुर), फकिरा कालु कुंभार (तासखेडा), छगन विठ्ठल कोळी (रायपुर) विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आय.जी.तडवी यांनी काम पाहिले. सेक्रेटरी महेंद्र सुरवाडे व लिपिक पंकज चौधरी यांनी सहकार्य केले.

