राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे उद्या जळगाव जिल्हा दौर्यावर
अमळनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
अमळनेर : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे शनिवार, 7 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार : दोघांविरोधात गुन्हा
अमळनेरात पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमळनेर येथे शनिवारी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होईल, त्यानंतर अमळनेर मतदारसंघातील इंधवे (ता.पारोळा) येथे सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संवाद मेळावा होईल. राष्ट्रवादीचे कार्यालय धुळे रोडवरील सिद्धीविनायक कॉलनीत झाले आहे. त्याच्या उद्घाटनाला माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर चेअरमन, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार राजीव देशमुख, चाळीसगाव माजी आमदार साहेबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित असतील.
