कंजरवाड्यातील वाद प्रकरण : आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल


जळगाव : जुन्या भांडणाची तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन 3 मे रोजी रात्री कंजरवाडा परिसरात दोन गटात हाणामारी होऊन दंगल घडली. याप्रकरणी एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून यावलच्या तरुणावर चाकूहल्ला

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
पहिल्या फिर्यादीत बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ललित दीक्षित, बबलू धनगर, आकाश सोनार, अविनाश राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन चौघांना अटक करण्यात आली. यानंतर बुधवारी रात्री आकाश सोनार याने फिर्याद दिली. त्यानुसार आकाश दहियेकर याने जुने वाद मिटवण्याच्या बहाण्याने पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बोलावून घेतले. परंतु, भेट झाल्यानंतर आकाशसह मयूर जमनादास बागडे, केतन गौतम बागडे, नाक्या विशाल, टारझन अरुण दहियेकर, सिंगीबाई आकाश दहियेकर, बाबु कंजर, गोपाल दशरथ माचरे व इतर पाच ते सहा जणांनी कोयता घेऊन हल्ला चढवला. त्यात आकाश सोनार, बबलू धनगर हे दोघे जखमी झाले. सोनार याने दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणार्‍या जमावावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.

हाणामारीनंतर परत जाताना दुचाकी फोडली
दोन गटात तुफान दगडफेक, दंगल झाल्यानंतर एक गट परत जात असताना त्यांनी दहशत माजवण्यासाठी जगदीश सुकलाल भोई यांच्या दुचाकीसह इतर वाहने फोडली. भोई यांच्या दुचाकीचे (क्रमांक एमएच-19, डीएल 7960) पेट्रोल संपले असल्याने ते पायी दुचाकी ढकलत मित्र सागर राजू पाटील याच्यासह जात होते. समोरुन येणार्‍या आठ ते दहा जणांच्या जमावाने लाठ्या घेऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. भोई आणि पाटील यांना मारहाण केली. तसेच दुचाकी फोडल्या. भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश सपकाळे तपास करीत आहेत.

राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे उद्या जळगाव जिल्हा दौर्‍यावर 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !