शिक्षकांचे चेहरे फुलले आनंदाने : कर्मचार्‍यांची 40 कोटींची रक्कम एनपीएस खात्यात जमा

वेतन विभाग प्राथमिकच्या कार्य तत्परतेमुळे शिक्षकांमध्ये समाधान


भुसावळ : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांच्या डीसीपीएस खात्यातील सुमारे 40 कोटींची रक्कम वेतन विभाग प्राथमिक जळगाव कार्यालयाच्या कार्यतत्परने नवीन पेन्शन योजनेच्या (एनपीएस)खात्यात जमा करण्यात आली आहे. 2005 पासून 2021 पर्यंत सुमारे 16 वर्षांपासून अंशदायी पेन्शन (डीसीपीएस) योजनेचा कर्मचारी, शासन, व्याजाचा हिस्सा एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजनेमध्ये जमा करण्यात आल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये आनंद पसरला आहे.

590 कर्मचार्‍यांची रक्कम कपात
1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय/निमशासकीय सेवेत रूजू होणार्‍या कर्मचार्‍यांसाठी महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) सुरू केली. ही योजना जरी 01 नोव्हेंबर 2005 पासून लागू करण्यात आली असली तरी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत काम करणार्‍या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या या योजनेअंतर्गत कर्मचार्‍यांच्या वेतनातून मूळ वेतनाच्या 10 टक्के कपात प्रत्यक्ष मात्र मार्च 2016 पासून सुरू करण्यात आली. या डीसीपीएस योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील खाजगी प्राथमिकच्या जवळपास 590 कर्मचार्‍यांची रक्कम कपात करण्यात येत होती.

प्राथमिक शिक्षण वेतन विभागाची तत्परता
कपातीच्या रकमेचा शासन हिस्सा व व्याजासह हिशेब मिळावा म्हणूनची मागणी सर्व स्तरांवर लावून धरली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने अचानक डीसीपीएस योजना केंद्र सरकारच्या एनपीएस योजनेत वर्ग केली. त्याच वेळी डीसीपीएस योजनेंतर्गत कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या रकमेचा हीशेब करून सर्व रक्कम एनपीएस मध्ये वर्ग होणे अपेक्षित होते पण तसे काही झाले नाही. ही सर्व रक्कम लवकरात लवकर जमा होण्यासाठी प्राथमिक शिक्षण वेतन विभागाने कार्य तत्परतेने काम सुरू केले.

एनपीएस योजनेस पात्र शिक्षकांमध्ये आनंदाची लहर
वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक जळगाव यांना सहाय्यक लेखाधिकारी दीपक धनगर नंदुरबार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वेतन अधिक्षक आर.बी. संदांनशिवे व त्यांच्या सर्व सहका-यांनी सदरच्या कामात विशेष लक्ष घालून, प्राधान्याने सदरचा हिशेब तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या कामात खाजगी प्राथमिक अनुदानित शाळा जळगावचे काही तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक व खाजगी शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे सहकार्य देखील लाभले. यामुळे एनपीएस योजनेस पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहेत.

खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची मागणी : फैजपूर मंडळाधिकार्‍यांविरोधात खंडणीचा गुन्हा

तब्बल 9 अंकी आहे रक्कम
खाजगी प्राथमिक अनुदानित शाळा जळगावच्या 590 डीसीपीएस धारक कर्मचार्‍यांची सदरची जवळपास रक्कम 40 कोटी 74 लाख 99 हजार 255 इतकी मोठी रक्कम 4 मे रोजी संबंधित कर्मचार्‍यांच्या एनपीएस खात्यात जमा करण्यात आली. यासाठी शालार्थ तज्ञ जयेश शिरसाठ, अतुल भोई, समीर तडवी, दीपक पाटील, तेजेंद्र महाजन, सागर झांबरे, भूषण अमृतकर, तुषार भोळे ,अजित चौधरी, गोविंदा लोखंडे ,अर्चना क्रहे, सोनवणे यांनी परीश्रम घेतले.

कमी वेळेत काम : वेतन अधीक्षक संदांनशिवे
डीसीपीएस स्लीप बनविताना खूप अडचणी येत होत्या परंतु इन्स्पेक्शनसाठी नंदुरबार वेतन पथक प्राथमिकचे सहाय्यक लेखा अधिकारी दीपक धनगर हे वेतन पथक प्राथमिक जळगांव कार्यालयात तपासणीसाठी आले असता त्यांनी स्वतः बनवलेले डीसीपीएस सॉफ्टवेअर वेतन पथक प्राथमिक जळगांव कार्यालयास दिले. त्यानंतर शालार्थ तज्ज्ञांचे कॅम्प घेऊन समजून सांगितले. त्यानंतर भगीरथ शाळेचे चेअरमन व मुख्याध्यापक शाम ठाकरे यांनी या कामासाठी शाळा व संगणक लॅब उपलब्ध करून दिली. सर्व टीमने रात्री 2 ते 3 वाजे पर्यंत वेळ न बघता आठ दिवस सतत काम केले. सर्वांच्या सहकार्याने आणि मेहनतीने कमी वेळेत काम पूर्ण करू शकलो असल्याचे वेतन अधीक्षक आर.बी.संदानशीवे म्हणाले.

कोपरगाव तालुक्यातील भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !