जळगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवले
जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची मागणी : फैजपूर मंडळाधिकार्यांविरोधात खंडणीचा गुन्हा
संशयीताविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 1 मे रोजी रात्री 8 वाजता मुलगी ही घरी असतांना गावातील मगन रामकृष्ण मोरे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबतचा संशय पीडीत मुलीच्या वडीलांनी व्यक्त करीत गुरूवार, 5 मे रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने संशयीत आरोपी मगन मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.
