अपघातांची मालिका कायम : महामार्गावरील भीषण अपघातात सात जण ठार


नागपूर : भरधाव काने ट्रकला ओव्हरटेक केल्यानंतर ट्रकला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले तर एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेसह 6 पुरुषांचा समावेश आहे.

भरधाव कार ट्रकवर धडकली
कारमध्ये बसून नागपुरातील प्रवासी उमरेडमार्गे नागपूरला येत असताना सागर शेंडे हा गाडी चालवत होता. रात्रीची वेळ असल्याने चालकाने गाडीचा वेग वाढवला होता. या गाडीसमोर एक ट्रकही धावत असताना कारने ट्रकला ओव्हरटेक केले. यावेळी रस्त्याच्या कडेला ट्रक उभा होता. ट्रकला ओव्हरटेक केल्यानंतर कार ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

यांचा जागीच मृत्यू
या अपघातात अश्विन देविदास गेडाम (33), गाडी चालक सागर संपत शेंडे, स्नेहा आशिष भुजाडे (30), आशिष विजय भुजाडे (33), नरेश बाजीराव डोंगरे (49), मेघनाथ पांडुरंग पाटील (63), पद्माकर नथ्थूजी भालेराव (वय 50) यांचा समावेश आहे. आशिषचे परीसरात रेशन धान्य विक्रीचे दुकान, तर नरेश डोंगरे यांचा कॅटर्सचा व्यवसाय होता. यात एक मुलगी बचावली. रस्त्याने जाणार्‍यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर उमरेड व कुही पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !