भरधाव कार रीक्षावर आदळली : चिंचोलीचा रीक्षा चालक अपघातात गंभीर
Jalgaon Accidant जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत रीक्षा चालक जखमी झाला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
मुक्ताईनगर हादरले : बंद सराफा दुकानातून 30 लाखांचे दागिने दरोडेखोरांनी लांबवले
कार चालकाविरोधात गुन्हा
सुभाष जयराम पाटील (50, चिंचोली, ता.जि.जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे रीक्षा (एम.एच.19 व्ही. 9321) असून शनिवार, 7 मे रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास चिंचोली गावातील बसस्थानकाजवळ प्रवासी सोडल्यानंतर ते रक्षाने घरी जात असतांना जळगाव ते औरंगाबाद राष्ट्रीय मार्गावर भरधाव कार (एम.एच. 12 एन.यू.848) ने जोरदार धडक दिल्याने रीक्षा चालक सुभाष पाटील हे जखमी झाले. त्यांना जळगावातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सोमवार, 8 मे रोजी दुपारी सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गफ्फुर तडवी करीत आहे.