चोरट्यांना भावली बुलेट : न्हावीतील दुचाकीधारकाला लाखाचा फटका


फैजपूर : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र शहरांमध्ये सुरू असताना चोरट्यांनी आता ग्रामीण भागाकडेही पावले वळवली आहेत. यावल तालुक्यातील न्हावी गावातून घरासमोर पार्किंगमध्ये लावलेली एक लाख रूपये किंमतीची बुलेट चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल-भुसावळ बसवर चिंचेचे झाड आदळले : 13 प्रवासी जखमी

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
युवराज पोपट चोपडे (26, बसस्थानकाजवळ, न्हावी, ता.यावल) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवार, 8 मे रोजी रात्री 12.30 ते पहाटे तीन वाजेच्या दरम्यान त्यांच्या मालकीची बुलेट (एम.एच.19 सी.एल. 5558) घरासमोर पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी ही बुलेट चोरून नेली. हा प्रकार पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीला आला. सोमवार, 9 मे रोजी सायंकाळी सात वाजता युवराज चोपडे यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश बर्‍हाटे करीत आहे.

एरंडोल शहरातील विवाहितेची आत्महत्या : एकाविरोधात गुन्हा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !