पाचशे रुपयांची लाच पोलिसाला भोवली : एसीबीच्या कारवाईने पोलिस वर्तुळात खळबळ


सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील सदर बझार पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली. नाना वेशा शिंदे (37, रा. अरविंद धाम पोलीस लाईन, सोलापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

प्रमाणपत्रासाठी मागितली लाच
तक्रारदार याच्याविरूध्द सीआरपीसी 107 प्रमाणे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तक्रारदार याना सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे 2 मे ते 10 मे 2022 या कालावधीमध्ये दैनंदिन हजेरी लावण्यात आली होती. त्यानुसार सदर बझार पोलिस ठाणे येथे हजर राहून हजेरी लावली असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्याकरिता पोलीस नाईक नाना शिंदे यानी तक्रारदारास 500 रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारलेे असताना त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, उमाकांत महाडिक, पोलीस नाईक पकाले, घुगे, लण्णके यांनी पार पाडली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !