भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखीचा मृत्यू
भुसावळ : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक दोनवर जळगाव साईडला 40 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाला. 9 रोजी ही घटना घडली. या बाबत ऑनड्युटी स्टेशन उपप्रबंधकांनी रेल्वे लोहमार्ग पोलिसांना माहिती सूचित केल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
मयताची उंची 5.4, रंग काळा, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे केस वाढलेले, चेहरा गोल, नाक सरळ, मिशी बारीक असे मयताचे नाव आहे. मयताचा डावा डोळा पांरा झाला असून अंगात निळ्या रंगाचा चौकडीचा शर्ट, पांढरी मळकट पँट असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांशी 02582-222338 वा तपासी अंमलदार एएसआय प्रदीप राणे (8788342796) वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.