मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह बाळा नांदगावकरांना जीवे ठार मारण्याची धमकी


मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि याच मनसे नेते बाळा नांदगावकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. याबाबत नांदगावकरांनी गृहमंत्र्यांना भेटून याची माहिती दिली आहे.

गृहमंत्र्यांना दिली माहिती
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी राज ठाकरे आणि आपल्याला धमकीचे पत्र आल्याची माहिती दिली. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची माहिती दिल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं. काल नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचीही भेट घेतल, तसेच त्यांना या पत्राची प्रतही दिली. याबद्दल नांदगावकर म्हणाले, मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पत्राची प्रत मी काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली आहे. बोलणं झालं आहे. हे पत्र कोणाकडून आलंय याबद्दल माहिती नाही. नांदगावकरला धमकी दिली तर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य , केंद्र सरकरानेही घ्यावी. असा इशारा त्यांनी दिला.



पत्रात उर्दू शब्दांचाही वापर
नांदगावकर म्हणाले की, धमकीचं हे पत्र हिंदीतून लिहिलेलं आहे. या पत्रात काही उर्दू शब्दही वापरण्यात आले आहेत. या प्रकरणी आपण गृहमंत्र्यांशी बोललो आहे. ते चांगले गृहमंत्री आहे, ते नक्कीच कारवाई करतील, असंही नांदगावकर म्हणाले आहे. राज्य तसेच केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !