भुसावळ शहरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात : भव्य शोभायात्रेने वेधले शहरवासीयांचे लक्ष
समाजबांधवांतर्फे दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
भुसावळ : क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. जयंतीनिमित्त राजपूत समाज बांधवांतर्फे शहरात बॅनर लाऊन तसेच स्मारकाची जागा सजवत रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आले. शोभायात्रेत सायंकाळी आमदार संजय सावकारे, रेल्वेचे अपर डीआरएम रुकमैय्या मीना, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर शोभायात्रेस सुरवात झाली.
अट्रावलच्या वयोवृद्धेचा पाटचारीत पडल्याने मृत्यू
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, दामोदर राजपूत, चंदूसिंग चव्हाण, रणजीतसिंग राजपूत, आनंदा पाटील, विक्रांतसिंह कुशवाह, विकी राजपूत, दलजीत चौधरी, किरण पाटील, सोनू राजपूत, शैलेश पाटील, संजीव पाटील, सोनी ठाकूर, अनुप ठाकूर, गोपी राजपूत, संदीप राणा, बबलू सिंग, विजय राजपूत, सुमित राजपूत, भागवत राजपूत, अनिल पाटील, पंकज राजपूत, समाधान महाजन, सुरतसिंग पाटील, गणेश पाटील, अशोक चौधरी, राजू सुर्यवंशी, संजय पाटील, सुनील राजपूत, गुलाबसिंग राजपूत, जयवीर राजपूत, किरण पाटील, अमोल पाटील, मोहमसिंग ठाकूर, विनोद पवार, नरेंद्रसिंग ठाकूर, पवन पाटील, दिवाणसिंग राजपूत, गणेश पाटील, नवलसिंग राजपूत, प्रवीण पाटील, डॉ.अमोलसिंग चव्हाण, नरावीरसिंग राऊळ, संजयसिंग चौव्हाण, श्याम गोविंदा, भारती चौव्हान, दीपाली पाटील, संगीता पाटील, कविता पाटील, निर्मला पाटील, मंगला पाटील, उज्वला पाटील, पद्मा पाटील, प्रियंका पाटील, सुनीता पाटील, सपना पाटील, प्रिया राजपूत, संगीता राजपूत, सोनल राजपूत, सोनाली पाटील, कल्पना रावल, अर्चना राजपूत, वैशाली राजपूत, यमुनाबाई पाटील, संध्या चौव्हान, अनिता चौव्हान, हर्षा चौधरी, सुरभी चौधरी व इतर समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते. माजी आमदार संतोष चौधरी यांनी स्मारकाचे पूजन केले. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यांनी चोख बंदोबस्त राखला.
विद्यूत लोको शेड
भुसावळ : क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये इतिहासात पाहिल्यांदा वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती साजरी करून तेल चित्र लावण्यात आले. याप्रसंगी विद्युत लोको शेडचे वरीष्ठ मंडळ विद्युत अभियंता हिमांशू रामदेव व विद्युत अभियंता सौरभ गोयल यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. थोर पुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यूत लोको शेडचे पर्यवेक्षक, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, एनआरएमयु शाखा सचिव ललित भारंबे, एस.टी.एस.एस.टी.असोसिएशचे अध्यक्ष विशाल सापकडे, सचिव समाधान हिवाळे, सीआरएमएसचे संजय भारंबे, जयेश ढाकणे, एबी सी असोसिएशनचे नागसेन यशोदे, राजू वानखेडे, ओबीसी असोसिएशनचे महेश राणे, सीओएस मकासरे, रेल कामगार सेनेचे संजय चौधरी, सतेज पाटील, राजकुमार गवळी, चेतन तायडे, गोविंद शिंदे, दीपकसिंग राजपूत, चेतन तायडे, निलेश इंगळे, विशाल हिरोडे, अक्षता गढवाल, अंजली बाणाईत, शैलेश गायकवाड, शैलेश पाटील, संदीप वाडे, अभियंता जीवन भोळे, राजेश भारंबे, विरेंद्र कुमार, पांडुरंग वानरे, अनिल घुले, नेत्रपाल सिह व शेडचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी हिमांशू रामदेव यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. आयोजन रुपसिंग पाटील, रंजीतसिंग चौधरी, अजय महाजन, मोहनसिंग राजपूत, राहुल राजपूत, भूषणसिंग राजपूत, लक्ष्मण सिंग, कृष्णा महाजन, जयवंत सिह, दीपक बोयडे, ललित चौधरी यांनी केले होते. सूत्रसंचालन नरेंद्र कोटूरवाल यांनी तर आभार ललितकुमार मुथा यांनी मानले.