रावेरातील शौचालय योजनेत गैरव्यवहार : आरोपींच्या मालमत्तेवर येणार टाच
रावेर : शौचालय योजनेच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्ह्यातील दोघे आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असून पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचार्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दीड कोटी रुपये रकमेचा आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहे.
किरीट सोमय्या हे हिमनगाचे एक टोक असून आता भाजपच्या 28 नेत्यांचे प्रकरण काढणार : खासदार संजय राऊत
दोन्ही संशयीत आरोपी रफुचक्कर
रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात येथील पंचायत समितीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेत गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांनी सुमारे दिड कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गुन्हा दाखल होताच संशयीत पसार झाले आहेत. पोलिसांनी सर्वच आरोपींचा शोध सुरू केला असलातरी आरोपी गवसत नसल्याने आता त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वरीष्ठ सहाय्यक लेखाधिकारी लक्ष्मण पाटील, लेखाधिकारी फकिरा तडवी, ग्राम विस्तार अधिकारी डी.एच.सोनवणे, ग्राम विस्तार अधिकारी दीपक संदानशीव, ग्रामसेवक कांतीलाल कोळी यांना सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपींना अटक झाल्यावर या प्रकरणात आणखी कोणकोणत्या अधिकार्यांचा समावेश आहे ? हे चौकशी नंतर स्पष्ट होणार आहे.




