बोहर्डीतील तरुणाकडून दोन तलवार जप्त : वरणगाव पोलिसांची कारवाई


भुसावळ : तालुक्यातील बोहर्डी येथील तरुणाकडून दोन तलवारी वरणगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जप्त केल्या आहेत. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र उत्तम कोळी (33, बोहर्डी, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ग.स.सोसायटी ‘सहकार’कडे : अध्यक्षपदी उदय पाटील तर उपाध्यक्षपदी रवींद्र सोनवणेंची निवड 

गोपनीय माहितीवरून कारवाई
बोहर्डी गावातील तरुणाकडे बेकायदेशीररीत्या दोन तलवारी असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशीष अडसुळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी 11 रोजी कर्मचार्‍यांना कारवाईचे आदेश दिले. कॉन्स्टेबल पराग राजेंद्र दुसाणे, पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, एएसआय नरसिंग चव्हाण, चालक ईस्माईल शेख आदींनी जितेंद्र कोळी यांच्या घराच्या मागच्या बाजूला झडती घेत मक्याच्या चार्‍याच्या ढिगार्‍यून दोन तलवार जप्त केल्या. जितेंद्र कोळी याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पराग दुसाणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जितेंद्र कोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोहर्डीतील तरुणाकडून दोन तलवार जप्त : वरणगाव पोलिसांची कारवाई 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !