दीपनगरात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात


दीपनगर : दीपनगरातील नवीन क्लबमध्ये महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समितीचे सचिव .अश्विन शेकरवार यांचे चिरंजीव हर्षद शेकरवार यांनी महाराजांवर आधारीत काव्य स्वरूपात कविता सादर केली. भूषण पाटील यांनी प्रास्ताविक केले. अमरसिंग परदेशी साहेब यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
अध्यक्ष अमरसिंग परदेशी, उपाध्यक्ष प्रशांत सिसोदे, सचिव अश्विन शेकरवार, सी.डी.पाटील, संदीप राजपूत, भूषण पाटील, राजू राजपूत, पंकज पाटील, अनिल पाटील, कैलास पाटील, अमोल सालोक, खुषालसिंग पवार, जी.के.पाटील व समाजबांधवांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !