चुंचाळे गावात उद्या गुरुशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा


यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील गुरु रघुनाथ बाबा व शिष्य वासुदेव बाबा हे एकाच दिवशी वैशाख शुध्द बारसला समाधिस्थान झाले. या गुरु व शिष्य यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे शुक्रवार, 13 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

ग.स.सोसायटी ‘सहकार’कडे : अध्यक्षपदी उदय पाटील तर उपाध्यक्षपदी रवींद्र सोनवणेंची निवड 

गुरु-शिष्यांची एकाच तिथीवर पुण्यतिथी
समर्थ सद्गुरु सुकनाथ बाबा यांची तपोभूमी, श्री समर्थ सद्गुरु रघुनाथ बाबा यांची जन्मभूमी, श्री समर्थ सद्गुरु वासुदेव बाबा यांची कर्मभूमी चुंचाळे, ता.यावल हे गाव आहे. गावातील मंदिरात गुरु श्री रघुनाथ बाबा व शिष्य श्री वासुदेव बाबा या दोघा गुरुशिष्यांची पुण्यतिथी एकाच दिवशी एकाच तिथीवर म्हणजे वैशाख शुद्ध बारसला साजरी होते. गुरु आणि शिष्य दोघांची पुण्यतिथी एकाच दिवशी एकाच तिथीवर असा गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा दुर्मिळ असतो तोच सोहळा शुक्रवार, 13 रोजी चुंचाळे येथे साजरा होत आहे. भाविक, भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होत दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सुकनाथ बाबा श्री रघुनाथ बाबा श्री वासुदेव बाबा यांचे शिष्य मंडळ व चुंचाळे, बोराळे गावकरी मंडळींनी केले आहे.



कर्तव्यात कसुरी भोवली : जळगाव मनपाच्या तीन कर्मचार्‍यांचे निलंबन 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !