राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जळगावात बदनामी : गुन्हा दाखल


जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी केल्याची प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात दोन फेसबुक धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे आक्षेपार्ह फोटो व मजकूर अंकित पाटील आणि हरीष कोळी या नावाच्या फेसबुक धारकांनी टाकून व्हायरल केले. यामुळे शरद पवार यांची मोठ्या प्रमाणावर बदनामी केली. शिवा पोस्टवर अश्लिल शिवीगाळ देखील केली आहे. याबाबत जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून दोन फेसबुक धारकांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अंकित पाटील आणि हरीष कोळी या नावाच्या फेसबुक धारकांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !