घराला लागलेल्या आगीत साडेपाच लाखांची रोकड खाक


जामनेर : कुंभारीसिम येथील युवराज पुंडलिक पाटील यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री रात्री आग लागली. या आगीत कापूस विकून आलेल्या साडेपाच लाख रूपयांच्या रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्याची जळून राख झाली. घरातील सर्वजण बाहेर झोपलेले असल्याने सुदैवाने जिवीतहाणी टळली आहे.

कुटुंब घराबाहेर झोपले असताना आग
याविषयी अधिक माहिती अशी की, “युवराज पाटील हे आपल्या कुटूंबासह कुंभारीसिम येथे रहातात. जावई संजय पाटील व मुलगी योता हे घरी आलेले असल्याने सोमवारी रात्री सर्वांनी सोबत जेवण केले. उन्हामुळे होत असलेला उकाडा पहाता जेवणानंतर पुंडलिक केशव पाटील या वृध्द वडीलांसह युवराज पाटील, पत्नी रत्ना पाटील, मुलगा प्रमोद व तेजस, जावई व मुलगी असे सर्वजण घराबाहेर झोपले.

मध्यरात्रीच्या सुमारास आग
मध्यरात्री काहीतरी जोरात आवाज होऊन घरातून धूर निघतांना दिसला. एकच मुख्य दरवाजा असल्याने निघणारा प्रचंड धूर पाहता घरात जाणे शक्य नव्हते. एव्हाना आग लागल्याचे लक्षात आल्याने शेजाऱ्यांच्या नागरीकांनी मिळेल तसे पाणी टाकून आग विझविली. त्यानंतर घरात प्रवेश केला असता संपूर्ण संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली होती. त्याचबरोबर कापूस विकून आलेले साडेपाच लाख रूपयेही जळाल्याने युवराज पाटील यांचे कुटूंबातील सदस्यांना रडू कोसळले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !