ट्रकने रीक्षा व क्रूझरले उडविले : तिघे ठार
पारोळा : धुळे जिल्ह्यातील आर्वी शिवारात झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून यात पारोळा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
भीषण अपघातात तिघे ठार
या संदर्भातील माहिती अशी की, मालेगावहून भरधाव वेगात येणार्या ट्रक (एम.पी.०९ एच.एच.५२०) ने बस (एम.एच.४१ ए.टी.0347) ला जोरदार धडक दिली. याच ट्रकने त्याचवेळी धुळ्याकडून नाशिकच्या दिशेने क्रुझर (एमएच-२१-व्ही-२१५९) जात होती. तिला ट्रकने समोरून धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. यात सरला पंडित सोनवणे (२८), महेंद्र चुडामण सोनवणे (५१, दोघे रा. तरडी, ता. पारोळा, जि. जळगाव) आणि ऐपे रीक्षा चालक रईस शेख (४८, रा. मालेगाव, जि. नाशिक) या तिघांचा समावेश आहे.
ट्रकचा चालक पसार
या अपघातात प्रमोद रमेश सोनवणे, सुरेश नारायण सोनवणे, शैलेश पंडित सोनवणे, विद्या भूषण कानडे, ताराबाई अशोक वसरे, सुपडू बारकू वसरे, कोमल प्रमोद सोनवणे, वसंत पंडित वंजारी, सुधीर अभिमन पाटील, अरुणा प्रमोद पाटील आदी जखमी झाले आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







