चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लांबवला


जळगाव : शहरातील शाम नगर येथून तरुणाचा १० हजार रुपयांचा मोबाईल लांबविल्याची झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अज्ञातांनी लांबवला मोबाईल
श्याम नगर येथे सुनील तुकाराम गजाकुश (34) हे राहतात. 15 मे रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्यांचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीस गेल्याचे समोर आले. याप्रकरणी सुनील गजाकुश यांनी मंगळवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !