जळगावातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव : आजारपणाला कंटाळून शहरातील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विलास बाबुराव महाजन (३५, रा. खोटेनगर) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
गळफास घेऊन केली आत्महत्या
शहरातील खोटे नगर परीसरातील झाडाखाली विलास महाजन हा राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी देखील होता. या आजारपणाला कंटाळून विलास याने ज्याठिकाणी राहत होता त्याच ठिकाणावरील झाडाला रुमालाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्या परीसरातील रीक्षा स्टॉपवरील रीक्षा चालकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वासुदेव सोनवणे, सतिष हाळनोर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह खाली उतरवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय सोनवणे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परीवार आहे.







