भुसावळातील आराधना काॅलनीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या


भुसावळ : शहरातील आराधना काॅलनीतील रहिवासी राजेश शंकर विसपुते (वय ५०) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी १२.४५ वाजेपूर्वी घडली. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली.

राहत्या घरी आत्महत्या
राजेश विसपुते हे घरी एकटेच हाेते, त्यांचा मुलगा व सून हे जळगाव येथे गेले हाेते, याच काळात राजेश विसपुते यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सहा महिन्यापूर्वीच राजेश विसपुते यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तेव्हापासून ते दारूच्या आहारी गेले हाेते. घटनेची माहिती राेहीत गाेसावी यांनी शहर पाेलिस ठाण्यात दिल्यावर सहायक पाेलिस निरीक्षक विनाेदकुमार गाेसावी, पराग साेनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह खाली काढला. विसपुते यांचे शव विच्छेदन ट्रामा केअर सेंटरला झाले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !