पिंप्री अकराऊत गावातील 22 वर्षीय युवकाची आत्महत्या
मुक्ताईनगर : तालुक्यातील पिंप्रीअकाराऊत येथे बुधवारी राहत्या घरात २२ वर्षीय युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंप्रीअकाराऊत येथील रहिवासी मंगेश निवृत्ती माळी वय २२ या युवकाने राहते घरातील छताचे पाईपाला दोरी बांधुन गळफास घेतल्याची घटना घडली. मृत्युचे कारण समजु शकले नाही. याप्रकरणी सुभाष माळी (रा.पिंप्रीअकाराऊत) यांचे खबरीवरुन पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.तपास हवालदार संजीव पाटील करीत आहे.







