Jalgaon ACB Trap चारशे रुपयांची लाच भोवली : जळगावात खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात


Jalgaon Tahasil ACB Trap जळगाव : रेशनकार्डाची दुय्यम प्रत तयार करून देण्यासाठी चारशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या खाजगी इसमाला जळगाव एसीबीच्या पथकाने जळगाव तहसील कार्यालयाच्या बाहेर लाच स्वीकारताच रंगेहाथ अटक केली. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी करण्यात आला. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. पराग पुरुषोत्तम सोनवणे (39, रा.खोटे नगर, जळगाव ता.जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कस्टमर केअर ऑफिसर बोलत असल्याचे सांगून किराणा दुकानदाराची लाखाची ऑनलाईन फसवणूक

चारशे रुपयांची लाच भोवली
28 वर्षीय महिला तक्रारदार यांचे रेशनकार्ड जुने व जीर्ण झाल्याने त्यांनी रेशनकार्डची दुय्यम नविन प्रत मिळणेसाठी जळगाव तहसीलच्या पुरवठा शाखेत अर्ज केला होता. यावेळी पुरवठा शाखेत खाजगी इसम सोनवणे याने रेशनकार्डचे काम करून देण्यासाठी चारशे रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदार महिलेला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

कुंपणानेच खाल्ले शेत : चाळीसगावात एस.टी.कर्मचार्‍यांकडून डिझेलची परस्पर विक्री : त्रिकूटाविरोधात गुन्हा










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !