चाळीसगाव शहरातून एकाची दुचाकी लंपास


चाळीसगाव : शहरातील हिरापूर रोडवरील एका हॉटेलवरून अज्ञात चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या
कुणाल राजेंद्र मिस्तरी (26, रा.सानेगुरूजी नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून 17 मे रोजी रात्री आठ वाजता कामाच्या निमित्ताने शहरातील हिरापूर रोडवरील हॉटेल जत्रा येथे दुचाकी (एम.एच.19 डी.बी.6237) ने आले होते. दुचाकी पार्क करून ते कामासाठी निघून गेले. अज्ञात चोरट्यांनी संधी साधत 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात मिस्तरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अभिमन पाटील करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !