मुलगाच हवा म्हणून विवाहितेचा छळ : पतीसह नणंदेविरोधात गुन्हा


भुसावळ : मध्य प्रदेशातील हरदा येथील रहिवासी व हल्ली शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी जॉयसी दिपक जेम्स याविवाहीतेचा लग्नात वडीलांनी कमी आंदन दिले तसेच विवाहीता गर्भवती असल्यावर मुलगाच पाहीजे असे म्हणत सासर्‍याला झालेल्या लखव्याच्या उपचारासाठी विवाहीतेने माहेरून एक लाख रूपये आणावे यासाठी शारीरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पती व नंणदेविरूध्द येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
मध्य प्रदेशातील हरदा येथील सासर असलेल्या व भुसावळ येथील माहेर असलेल्या जॉयसी दीपक जेम्स (20, रा.हरदा रेल्वे स्थानकाजवळ , ह.मु. हुडको कॉलनी, भुसावळ) या विवाहितेस 15 मार्च 20 ते 30 एप्रिल 21 या काळात विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला.

मुलगाच हवा म्हणून केला छळ
पती दीपक व त्याची बहिण दीपीका हॅन्डी जेम्स यांनी तुझ्या वडीलांनी लग्नात कमी आंदण दिले व विवाहीता जेव्हा गर्भवती होती, त्यावेळी मुलगाच पाहीजे या कारणावरून व सासरे हॅन्डी जेम्स यांच्या लखव्याच्या आजारावर औषधोपचार करण्यासाठी विवाहीतेने तिच्या माहेरून एक लाख रूपये आणावे, पैसे न आणल्यास तुला घरात राहू देणार नाही, अशी धमकी दिली, मारहाण करून शिविगाळ करीत शारीरीक व मानसिक त्रास दिला. या सर्व त्रासाला कंटाळून महिलेने येथील शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती दीपक व नणंद दिपीका यांच्या विरूध्द स्त्री अत्याचार, हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय कंखरे पुढील तपास करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !