साकळीत गावातील मंदिरातून चोरट्यांनी पितळी घंटा लांबवली


यावल : तालुक्यातील साकळी येथील श्री वाडेश्वर मंदिरातील पितळी घंटा चोरीला गेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

नऊ हजारांची घंटा चोरीला
साकळी येथे मनवेल रस्त्यावर श्री वाडेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरात प्रवेशद्वाराच्या समोरील भागात गणपतीच्या मूर्ती जवळ नऊ किलो वजनाची पितळी घंटा लावली होती. गुरुवारी सकाळी भाविक मंदिरात गेल्यावर ही घंटा चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. या मुद्देमालाची किंमत सुमारे 9 हजार रुपये आहे. यापूर्वी देखील मनवेल रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरातील पितळी घंटा चोरीला गेली होती.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !