प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल लांबवला : दोघे चोरटे जाळ्यात


भुसावळ : शहरातील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तीन वर झोपलेले प्रवासी ओम नारायण तातूराम देवरीया (रा.इटारसी) हे झोपलेले असतांना त्याच्या झोपेचा फायदा घेत दोन चोरट्यांनी त्यांच्या खिश्यातील मोबाईल लांबविला, याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. आरपीएफने सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून शहरातील दोन भामट्यांना अटक केली.

जळगावात रेशनकार्डासाठी मागितली लाच : खाजगी पंटराची पोलिस कोठडीत रवानगी 

दोघे चोरटे जाळ्यात
येथील रेल्वे स्थानकावर प्रवासाला जाण्यासाठी इटारसी येथील ओमनारायण तातूराम देवरीया हे आले होते. मंगळवारी प्लॅटफॉर्म तीनवर झोपलेले असतांना त्याच्या झोपेचा फायदा घेत, त्याच्या खिशातील मोबाईल चोरट्यांनी लांबविला. याबाबत देवरीया यांनी आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली. रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तीनवरील सर्वच बाजूंचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये शहरातील मटण मार्केटमधील रहिवासी असलम खान इब्राहिम खान व शेख शोएब शेख सलीम यांना पोलसांनी त्यांना अटक केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली.

जळगावात महिलेवर चाकूहल्ला : चौघांविरोधात गुन्हा 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !