भुसावळात एलटी लाईनची केबल जळाल्याने दोनशे घर अंधारात
वीज वितरणाच्या सावळा-गोंधळ कारभाराने संताप
भुसावळ : वीज वितरण कंपनीच्या कारभाराने आधीच त्रस्त असलेल्या नागरीकांना एलटी लाईनची केबल जळाल्याने पुन्हा मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. जामनेर रोडवरील वाल्मिक नगराला वीजपुरवठा करणारी महावितरण कंपनीची एलटी लाईनवरील एबी केबल सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजता जळाल्याने सुमारे 200 घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे या भागातील किमान 250 घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला. तब्बल 12 तासांनी दुरुस्ती करण्यात यश आल्याने नागरीकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. ब्रेकडाऊनचे कंत्राट असलेल्या ठेकेदाराने कामास विलंब केल्याने उशिराने दुरुस्ती झाल्याचे सांगण्यात आले.
मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशानंतर 15 लाखांचा गुटखा केला नष्ट
दुपारी एक वाजता वीजपुरवठा सुरळीत
जामनेर रोडवरुन वाल्मिक नगरला वीजपुरवठा करणार्या एलटी लाइनवरील एबी केबल सोमवारी मध्यरात्री जळून तब्बल 200 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर पर्यायी जोडणी करण्यात आली नाही तर मंगळवारी सकाळी देखील महावितरणचे ब्रेकडाऊनचे कंत्राट असलेल्या मे.चित्राक्षी एंटरप्राईजेस या ठेकेदाराने कामास विलंब केल्यानंतर सकाळी दहा वाजेनंतर दुरुस्तीचे काम सुरु होऊन या भागात दुपारी एक वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. महावितरणच्या ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या भागातील नागरीकांना किमान 13 तास वीजेविना रहावे लागले.

जळगावात खुनांचे सत्र कायम : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून







