!-- afp header code starts here -->

योगामध्ये विशेष प्राविण्य : भुसावळातील यश आंबेकरचा कुलगुरुंकडून गौरव


भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत समारंभात भुसावळ शहरातील यश प्रसाद आंबेकर यांचा योगिक सायन्स या विषयात विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी लीनता चौधरी तसेच अपूर्वा थत्ते यांचा ही सन्मान करण्यात आला.

राज्यपालांचा ऑनलाईन सहभाग
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी तसेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परीषद कार्यकारी समिती बंग्लोरच अध्यक्ष भूषण पटवर्धन हे तसेच अनेक मान्यवर ऑनलाइन सहभागी झाले होते. योगामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले यश आंबेकर हे सध्या आयुष्य मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्समध्ये टीएटीसी हा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.
मिळविलेल्या यशात एम.जे.कॉलेज जळगावच्या सोहम डिपार्टमेंटचे डॉ.देवानंद सोनार, प्रा.पंकज खासबागे, प्रा.ज्योती वाघ, प्रा.गीतांजली भंगाळे आणि वडील योगाचार्य प्रसाद आंबेकर आणि आई योगाचार्य प्रांजली आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे यश आंबेकर यांनी सांगितले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !