धरणगावचे नगराध्यक्ष सलीम पटेल यांचे निधन
लढवय्या वाघ हरपला ; दीर्घ आजाराने ओढवला मृत्यू
धरणगाव : शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ता व उपजिल्हाप्रमुख तसेच धरणगावचे नगराध्यक्ष असलेल्या सलीम अब्बामिया पटेल (47) यांचे रविवारी सकाळी नऊ वाजता निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून आजाराशी देत असलेल्या झुंजीचा आज अखेर झाला. त्यांच्या निधनाने लढवय्या वाघ हरपल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. पटेल यांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी दोन वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.