नेपाळमधील विमान अपघातात ठाण्यातील एकाच कुटुंबातील चौघे ठार
न्यायालयाच्या आदेशानंतर दाम्पत्याचे मनोमिलन ठरले अखेरचे
ठाणे : नेपाळमधील पोखरा येथून जोमसोमला जाणारे तारा एअर या कंपनीचे लहान आकाराचे एक प्रवासी विमान रविवारी कोसळल्याने ठाण्यातील एकाच कुटूंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे. लामचे नदीच्या किनारी कोवांग गावानजिक विमानाचे अवशेष आढळल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे. अशोक कुमार त्रिपाठी, वैभवी त्रिपाठी व मुलगा धनुष (22) व मुलगी रीतीका (15) अशी मयतांची नावे आहेत.
राज्यसभेतील तीन जागांवर भाजपाचा विजय निश्चित : माजी मंत्री गिरीश महाजन
काही क्षणात कोसळले विमान
विमानाने पोखरा येथून उड्डाण केल्यानंतर पंधरा मिनिटांतच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमान जिथे कोसळले तिथे लष्करी जवान तत्काळ रवाना झाले. विमानात ठाण्याच्या चार प्रवाशांसोबत जर्मनीचे दोन व नेपाळचे 13 प्रवासी होते. त्यापैकी अशोककुमार त्रिपाठी, रितिका त्रिपाठी, वैभवी त्रिपाठी, धनुष त्रिपाठी हे एकाच कुटुंबातील चारजण ठाण्याच्या कापुरबावडी भागातील रहिवासी आहेत.

भेट ठरली आयुष्याच्या अखेरची
न्यायालयाच्या आदेशानंतर 54 वर्षीय अशोक कुमार त्रिपाठी यांनी पत्नी वैभवी (51) आणि मुलगा आणि मुलगी यांच्यासह नेपाळला जाण्याचा विचार केला होता. यासाठी हे लोक तीन दिवसांपूर्वी नेपाळला पोहोचले होते. येथे पोहोचल्यानंतर यांनी मध्य नेपाळमधील जोमसोम या प्रसिद्ध पर्यटन शहराला भेट देण्याचे ठरवले. यासाठी तारा एअरलाइनमध्ये तिकीट काढले होते मात्र याच विमान अपघातात कुटुंबाचा अंत झाला. अशोक कुमार आणि वैभवी यांचा घटस्फोट झाला होता पण न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांना वर्षातून एकदा एकत्र येण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार अशोक 10 दिवस मुलांसह कुटुंबाला भेट देऊ शकत होता. कुटुंबात पती-पत्नीशिवाय 22 वर्षांचा मुलगा धनुष आणि 15 वर्षांची मुलगी रितिका होती. न्यायालयाचा आदेशानुसार, कुटुंब एकत्र यायचे, तोच त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला.
वैमानिकाच्या मोबाइलचा जीपीएसद्वारे घेतला वेध
तारा एअर कंपनीच्या कोसळलेल्या विमानामध्ये वैमानिक कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक उत्सव पोखरेल व किस्मी थापा ही हवाईसुंदरी असा कर्मचारी वर्ग होता. विमानाचा पायलट घिमिरेचा मोबाइल सुरू होता. त्यावरून जीपीएसच्या सहाय्याने हे विमान कुठे कोसळले असावे, याचा नेपाळच्या लष्कराला अंदाज आला.
युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी : देशातून श्रृती शर्मा पहिली







