!-- afp header code starts here -->

माजी गृहमंत्र्यांच्या अडचीत वाढ : सचिन वाझे माफीचा साक्षीदार

सीबीआय विशेष न्यायालयाची वाझेच्या अर्जाला अखेर मंजुरी


मुंबई : महाराष्ट्राचे बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध माफीचा साक्षीदार होणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी वाझेच्या अर्जाला मंजुरी दिली. वाझेने भ्रष्टाचार प्रकरणात देशमुखांसह अन्य आरोपींविरुद्ध माफीचा साक्षीदार होण्याची विनंती केली होती. न्यायालयाने वाझेला 7 जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले. वाझे आणि देशमुख वेगवेगळ्या प्रकरणांत न्यायालयीन कोठडीत आहेत.

मार्च महिन्यात वाझेला अटक
एनआयएने वाझेला मार्चमध्ये अटक केली होती. वाझे गेल्या वर्षी 25 फेब्रुवारीला मुंबईत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ गाडीत स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. देशमुख यांना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी बळजबरीची वसुली आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली होती.

शंभर कोटी वसुली प्रकरणात वाझे चर्चेत
गेल्या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्रात परमबीरसिंग यांनी आरोप ठेवला होता की, देशमुख अनेक चुकीच्या कामांमध्ये सहभागी होते. त्यांनी सचिन वाझेला मुंबईत बार आणि रेस्तराँतून 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने आता अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !