रावेरात अवैध गौण खनिज वाहतूक : डंपर केले जप्त
रावेर : अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे डंपर महसूल अधिकार्यांनी पकडले आहेत. यामुळे गौण खनिज वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक ऐरणीवर
रावेरकडून चिनावल गावाकडे जात असतांना विना परवाना गौण खनिज (मुरुम) वाहतूक करत असतांना खिरोदा मंडळ अधिकारी जि. डी. भंगाळे, तलाठी पी. पी. नायदे यांच्या पथकाने (एम.एच. 19 सि.टी. 6578) डंपर थांबवुन वाहतुकीचे परमिट तपासले असता त्यांच्याकडे परमिट नव्हते. यावेळी डंपर जप्त करण्यात आले.








