!-- afp header code starts here -->

घर खाली करण्याच्या कारणावरून तरुणासह तिघांना मारहाण


जळगाव : घर खाली करण्याच्या कारणावरून बळीराम पेठ येथे राहणार्‍या तरूणासह आई व बहिणीला मारहाण केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबातील सदस्यांना दमदाटी करीत मारहाण
निलेश राजेंद्रसिंग पाटील (39, बळीरामपेठ, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह करतात. 26 जून रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात निलेश पाटील यांच्यावर दाखल तक्रारीच्या चौकशीसाठी आई सुमित्रा पाटील यांच्यासोबत आले होते. त्यावेळी त्यांची भाचीचा फोन आल्यावर समजले की त्यांच्या घरात दोन जण घुसण्याचा प्रयत्न करत आहे. निलेश पाटील हे आई सुमित्रासह लागलीच घरी गेले. यावेळी शेख अफजल शेख कबीर व त्याच्यासोबत पाच ते सह जण येवून सांगितले की, मला घर मालक पदमसिंग निलसिंग व तुम्ही राहत असलेल्या घरच्या मालकांनी आम्हाला पुर्ण अधिकार दिला आहे. तू घर खाली कर. असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. आणि हातातील रॉड निलेशच्या डोक्यात टाकला तर शेख अफजल याच्यासोबत आलेल्या पाच ते सहा जणांनी निलेशच्या आई व बहिणीला धक्काबुक्की करून मारहाण केली. रॉडने घरातील नुकसान देखील केले आहे. जखमीवस्थेत निलेश पाटील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
उपचारानंतर निलेश पाटील यांनी दिलेल्या जबाबावरून गुरूवार,दि. 2 जून रोजी सायंकाळी 7 वाजता शहर पोलीस ठाण्यात शेख अफजल शेख कबीर याच्यासोबत असलेले पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

नंदुरबारात अश्‍लील व्हिडिओ कॉल करून खंडणी उकळणार्‍या पत्रकार, पोलिसासह महिलेला अटक


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !