चोरट्यांना उरली नाही देवाचीही भीती : बंद घरातून चांदीच्या मूर्त्या लांबवल्या
जळगाव : शहरातील गणेश कॉलनीजवळील भाग्योदय कॉलनीत बंद घर फोडून रोख रकमेसह चांदीच्या मूर्त्या लांबवण्यात आल्या. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
नानासाहेब पुंडलिक ठाकरे (68, भाग्योदय कॉलनी, गणेश कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. नानासाहेब ठाकरे यांचे घर 1 जून सकाळी 11.30 ते 2 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटातून पाच हजारांची रोकड आणि दोन हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या दोन मुर्त्या चोरून नेले. गुरूवार, 2 जून रोजी नानासाहेब ठाकरे घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे समोर आले. जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर गुरूवार, 2 जून रोजी रात्री 9 वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार तुषार जावरे करीत आहे.








