नास्त्याची गाडी लावणार्यावर चाकूहल्ला : दोघे संशयीत जाळ्यात
जळगाव : दुकान चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत एमआयडीसीतील व्ही-सेक्टर येथे चहा नाश्ताची गाडी लावणार्या तरुणाला दोन जणांनी चाकूने वार करून जखमी केले होते. या गुन्ह्यातील दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. आरोपी राहुल रामचंद्र बर्हाटे (रामेश्वर कॉलनी) व गणेश अर्जुन कोळी (अयोध्या नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
नास्ता विक्रेत्यावर केला हल्ला
अयोध्या नगर येथील रहिवासी शिवनाथ आसाराम शिंदे (35) हा एमआयडीसीतील व्हि-सेक्टर येथे हेरम्स कंपनीजवळ नाश्ता तसेच चहा विक्री गाडी लावतो. बुधवार, 1 जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहुल रामचंद्र बर्हाटे (रामेश्वर कॉलनी) आणि गणेश अर्जुन कोळी (अयोध्या नगर) हे दोघेही शिवनाथ शिंदे याच्या लोड गाडीजवळ आले. दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणत त्यांनी शिवनाथ शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी केली. शिंदे याने पैसे देण्यास नकार दिला असता त्याचा राग आल्याने गणेश कोळी याने शिवनाथ यास पकडून ठेवले तर राहुल रामचंद्र बर्हाटे याने शिंदे यांच्यावर चाकूहल्ला करून जखमी करून पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भोलाणेतून आवळल्या मुसक्या
दोन्ही हल्लेखोर हे भोलाणे येथे असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतात शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुकेश पाटील यांनी संशयित आरोपींना गुरूवारी 2 जून रोजी सकाळी 10.30 वाजता ताब्यात घेतले. दोन्ही संशयित आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती व्ही.सी.जोशी यांच्या न्यायासनापुढे दोघांना हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.
तरुणीशी गैरवर्तन : महावितरणच्या व्यवस्थापकासह लिपिकाविरोधात गुन्हा







