!-- afp header code starts here -->

जळगावात हॉटेल कामगारांनी केली एकास मारहाण


जळगाव : शहरातील भजे गल्लीतील सुयोग हॉटेलमध्ये काम करणार्‍या दोन जणांनी एकाला मारहाण व शिवीगाळ करत हातातील मोबाईल जबरीने हिसकावून नेला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
बाबासाहेब किसन गवळी (41, शनिपेठ गवळीवाडा, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून पानटपरी चालवून अपला उदरनिर्वाह करतात. 29 मे रोजी रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील भजे गल्लीतील हॉटेल सुयोग येथे बियरची बाटली घेण्यासाठी आले होते. हॉटेल सुयोगमध्ये काम करणारा अशोक काळे (हुडको) आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी बियरच्या बाटलीच्या पैश्यांवरून बाबासाहेब गवळी यांना शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांच्या हातातील पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून घेतला. बाबासाहेब गवळी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !