बारावी परीक्षेत कोकण विभागाची बाजी : यंदाही विद्यार्थिनीच टॉपर
मुंबई : बारावी परीक्षेचा बुधवारी निकाल जाहीर झाला असून त्यात राज्यात एकूण 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर दरवर्षीप्रमाणे यंदादेखील कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक 97.21 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला. त्यात 90.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकाल दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाइन पद्धतीनं पाहता येईल.
जाणून घ्या विभागनिहाय निकाल
कोकण- 97.21 टक्के
पुणे- 93.61 टक्के
नागपूर- 96.52 टक्के
औरंगाबाद- 94.97 टक्के
मुंबई- 90.91 टक्के
कोल्हापूर- 95.07 टक्के
अमरावती- 96.34 टक्के
नाशिक- 95.03 टक्के
लातूर- 95.25 टक्के
बारावी निकालाच मुलीच टॉपर
राज्याच्या बारावीच्या बोर्डाची पत्रकार परीषद मुधवारी सकाळी 11 वाजता झाली. यंदा 75 टक्के लेखी अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर किमान 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. तसेच तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रकल्प यासाठी दोन कालावधी देण्यात आले. 70 ते 100 गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी यंदा 30 मिनिटे जादा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला तर 40 ते 60 गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी 15 मिनिटं जादा वेळ देण्यात आला. शाळा तिथं परीक्षा केंद्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. बारावीच्या निकाल यंदाही मुलींनी बाजी मारली असून 95.35 टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 93.29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातर्फे 17 जूनला गुणपत्रिका दिल्या जातील.







