राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या
भुसावळ : राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी गृहखात्याने काढले आहेत. यामध्ये ठाण्यातील चार अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
या अधिकाऱ्यांच्या बदल्या
IPS राजेंद्र माने (CP सोलापुर)
IPS पंजाबराव उगले (एडिशनल कमिश्नर वेस्ट रीजन) ठाणे पुलिस
IPS दत्तात्रेय शिंदे (एडिशनल कमिश्नर ईस्ट रीजन) ठाणे पुलिस
IPS अक्षय शिंदे (SP जालना)
IPS अतुल कुलकर्णी (SP उस्मानाबाद)
IPS नंदकुमार ठाकुर (SP बीड)
बालासाहेब पाटिल (SP पालघर)
IPS महेश पाटिल (add CP ट्रैफ़िक) मुंबई पुलिस
IPS संजय जाधव (ADD CP एडमिन) ठाणे पोलीस
या ठिकाणी झाल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील पोलीस उपायुक्त अपर पोलीस अधीक्षक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी याबाबतचे आदेश काढले. सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र माने हे सध्या मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. हरीश बैजल हे सोलापूर पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला होता. सुधीर हिरेमठ यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारताच शहरातील अवैध धंदे विरोधात कारवाई आणि वाहतूक शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. सोलापूरचे पोलिस आयुक्त म्हणून राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र माने यांनी यापूर्वी देखील सोलापुरात कर्तव्य बजावले आहे. भूषणकुमार उपाध्याय हे सोलापूरचे पोलीस आयुक्त असताना राजेंद्र माने हे परिमंडळ विभागाचे उपायुक्त होते.
ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांची मुंबईत संरक्षण व सुरक्षा विभागात तर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांची पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. कुंभारे यांच्या रिक्त झालेल्या जागी पदोन्नतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाण्याचे अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांची बदली झाली आहे. उगले यांना पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या ठाणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती मिळाली आहे. ठाणे आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार यांची यापूर्वीच महाराष्ट गुप्तवार्ता अकादमीमध्ये बदली झाली आहे. आता पवार यांच्या जागी महामार्ग सुरक्षा पथकाचे (पुणे) अधीक्षक संजय जाधव यांची बढतीवर बदली झाली आहे. त्यामुळे जाधव यांच्याकडे लवकरच ठाणे प्रशासन विभागाची सूत्रे येतील. ठाण्याच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे तत्कालीन अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर ठाण्याच्या सह पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर कराळे यांचे पद रिक्त झाले होते. आता त्याजागी ठाणे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून पालघरचे अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे.







