ज्येष्ठ पत्रकाराचा मोबाईल तिघांनी लांबविला
जळगाव : तालुक्यातील खेडी बुद्रूक येथील पत्रकार यांचा रिक्षा प्रवासादरम्यान अज्ञात तीन जणांनी 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ज्येष्ठ पत्रकाराचा मोबाईल लांबवला
खेडी बुद्रूक येथील आचार्य अत्रेनगरात ज्येष्ठ पत्रकार हेमंत शंकरराव काळुंखे (67) हे वास्तव्यास आहेत. मंगळवार, 8 जून रोजी ते सकाळी 10 वाजेच्या सुमारास हॉटेल त्रिमुर्ती परीसरातील तुकाराम श्रीपाद चौधरी कॉम्प्लेक्स परीसरात आले होते. या दरम्यान पुन्हा घराकडे जाण्यासाठी रीक्षात बसले असता रीक्षात काळुंखे यांच्याजवळ बसलेल्या तीन जणांनी काळुंखे यांच्या शर्टाच्या खिशातील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. प्रकार लक्षात आल्यावर काळुंखे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन तीन जणाांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहेत.







