मृगाच्या सरी बरसताच चाळीसगावकर सुखावले


चाळीसगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी गुरुवारी मृ्रग नक्षत्राच्या सरी बरसल्याने उकाड्यापासून हैराण सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी
गुरुवारी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान वादळी वार्‍यासह पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वादळी वार्‍यामुळे ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे खरीपाच्या मशागतीच्या अंतिम कामांना पुन्हा जोर वाढणार आहे. शेतकर्‍यांची बी-बियाणे खरेदी करण्याची लगीनघाई सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मृ्रगाच्या सरींनी मेघगर्जनेसह वेळेवर हजेरी लावल्याने यंदा देखील समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !